`तो` चिमुकल्याला मांडीवर घेऊन रिक्षा चालवतोय!
पत्नीच्या आजारपणामुळे मुंबईत एका रिक्षाचालकाचा संघर्ष सुरु आहे. मोहम्मद सईद यांच्या पत्नीला लखव्याचा आजार झाल्यानं ती एका जागेवरुन हलू शकत नाही. त्यामुळे मोहम्मद सईद यांना आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करावा लागतोय.
मुंबई : पत्नीच्या आजारपणामुळे मुंबईत एका रिक्षाचालकाचा संघर्ष सुरु आहे. मोहम्मद सईद यांच्या पत्नीला लखव्याचा आजार झाल्यानं ती एका जागेवरुन हलू शकत नाही. त्यामुळे मोहम्मद सईद यांना आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करावा लागतोय.
आधीच घरची हलाखीची परिस्थिती, त्यात पत्नीचं आजारपण. यामुळे मोहम्मद सईद यांना पत्नीच्या उपचारासाठी लहानग्या मुज्जमिलला सोबत घेऊनच रिक्षा चालवावा लागतोय. सईद यांना दोन मुलं आहेत. तीन वर्षाच्या मुस्कानला ते शेजा-यांकडे सांभाळण्यासाठी ठेवतात. तर अडीच वर्षाच्या मुज्जमिलला सोबत घेऊन रिक्षा चालवतात.
अशी बिकट परिस्थिती असतानाही मोहम्मद सईद यांच्या नातेवाईकांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवलीय. त्यामुळे कोणताही पर्याय नसल्याने मोहम्मद सईद या रिक्षाचालकाचा संघर्ष सुरु आहे.