मुंबई : मुंबई पालिका निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे. आणि यामध्ये पुन्हा एकदा भाजपने वॉररुमच्या माध्यमातून सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सध्याच्या नोटबंदीच्या झालेल्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया किती प्रभावी ठरते हे बघावे लागेल. भाजपनं विधानसभा निवडणुकांच्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यामातून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता.  मात्र, आता तेच तंत्र पालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा  भाजप आजमावत आहे. मुंबई भाजपनं दादरच्या कार्यालयमध्ये वॉर रुमसाठी आवश्यक असलेली यंत्रणा केव्हाच उभी केली आहे.


भाजपनं नऊ महिन्यांपूर्वीच वॉररुम सुरु केली. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारमधील विकास कामं प्रत्येक वॉर्डपर्यंत वॉररुमच्या माध्यमातून पोहोचवली जातात. भाजपाच्या प्रत्येक वॉर्ड अध्यक्षाचे ट्वीटर, फेसबुक सुरु कऱण्यात आलंय. वॉर्ड अध्यक्ष पातळीवर व्हॉटस् अप ग्रुप बनवत भाजपचा प्रचार सुरु केलाय.  


 मुंबई पालिका निवणडणुकीमध्ये भाजप-सेना यांची युती होणार की, नाही हे चित्र अजून स्पष्ट नाही. मात्र, भाजपनं सर्व जागांवर प्राथमिक आढावा घेत प्रचाराला सुरुवात केलीय. सध्या नोटबंदी विषयावरुन विरोधी पक्षांसह शिवसेना भाजपवर तुटून पडली असून वातावरण तापायला सुरुवात झालीय. त्यामुळे हे सर्व पक्ष विरुद्ध भाजप असा सामना रंगणार हे स्पष्ट आहे.