मुंबई : महापालिकेचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला प्रस्तावित कोस्टल रोड कसा असणार आहे, याची एक चित्रफित जारी करण्यात आलीय. २९.२० किमी लांबीचा हा कोस्टल रोड असून तो मरिन लाईन्सवरील प्रिन्सेस स्टि्टपासून कांदिवलीपर्यंत असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रोजेक्टचे बजेट तब्बल १५ हजार कोटी रूपयांचे आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते बांद्रा वरळी सी लिंक या पहिल्या टप्प्यासाठी ५ हजार ३०० कोटी रूपयांचा तर  आणि बांद्रा वरळी सी लिंक ते कांदिवली या दुस-या टप्प्यासाठी ९ हजार ७९० कोटी रूपये खर्च येणार आहे.


२९.२० किमी अंतरामध्ये दोन बोगदेही बांधले जाणार असून त्यांची लांबी ६ किलोमीटर असणाराय. कोस्टल रोड शहरातील अंतर्गत रस्त्यांशी जोडण्यासाठी ११ ठिकाणी इंटरचेंजेस ठेवले जाणारेत. कोस्टल रोड बनविण्यासाठी १६८ हेक्टरवर भराव टाकला जाणार असून यापैकी ९८ हेक्टर क्षेत्र हे हरित क्षेत्राखालील आहे. 


कोस्टल रोडवर दोन्ही बाजूला सार्वजनिक वाहतूक म्हणजे बेस्ट बसेससाठी वेगळी मार्गिका ठेवली जाणाराय. ऑक्टोबर २०१७ पासून ख-या अर्थाने कोस्टल रोडच्या कामाला सुरूवात होणार आहे.