मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरूपम यांच्याविषयी प्रचंड नाराजी
मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे, मुंबई काँग्रेस नेते दिग्गज नेते आणि आमदार कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर.
मुंबई : मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे, मुंबई काँग्रेस नेते दिग्गज नेते आणि आमदार कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर, आता पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये मोठी नाराजी वाढत असताना दिसत आहे.
एकेदिवशी मुंबई काँग्रेसमध्ये फक्त संजय निरूपमच राहतील, असं आमदार कृष्णा हेगडे यांनी म्हटलं आहे, कृष्णा हेगडे यांनी रविवारी वर्षावर मुख्यमंत्र्याच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.
गुरूदास कामत यांनी आपण संजय निरूपम यांच्या नकारात्मक वागण्यामुळे मी पक्षापासून लांब राहत असल्याचं यापूर्वीच म्हटलं आहे. एकंदरीत कृष्णा हेगडे यांनी काँग्रेस सो़डल्यानंतर संजय निरूपम यांच्याविरोधातील विरोधी सूर अधिक आक्रमक होत असताना दिसत आहे.
गुरूदास कामत यांनी थेट महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्याविषयी टवीट करून नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी, तसेच अहमद पटेल यांना टवीट करून त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.