मुंबईच्या नगरसेवकांच्या मानधनात 5 पट वाढीची मागणी
मुंबईतल्या समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांकडे मासिक मानधनात पाच पट वाढ करण्याची मागणी केलीय.
मुंबई : मुंबईतल्या समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांकडे मासिक मानधनात पाच पट वाढ करण्याची मागणी केलीय.
त्यासाठी सपाचे गटनेते रईस शेख यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र लिहंलंय...2002 पासून मुंबईतल्या नगरसेवकांच्या मानधनात वाढ झालेली नाही. त्यामुळे ही वाढ करण्यात यावी अशी सपाच्या गटनेत्यांची मागणी आहे.
रईस शेख यांनी आपल्या पत्रात मानधन १० हजारावरून 50 हजार रुपये करण्याची मागणी केलीय.