दिपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : डॉक्टरांच्या संपामुळे राज्यभरात रुग्णांचे अतोनात हाल होतायत... मुंबईतल्या सायन, केईएमसह सर्वच रुग्णालयांमध्ये काम ठप्प आहे. सायन रुग्णालयात उपचाराआभावी एका 11 वर्षांच्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागलेत. शस्त्रक्रीया रद्द झाल्यामुळे रुग्णांचा जीव मेटाकुटीला आलाय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इरशाद शेख.. अवघ्या 11 वर्षाचा चिमुरडा... मारहाण म्हणजे शाळेतली मस्ती, एवढंच माहित असलेला... संप हा शब्दही त्यानं ऐकला नसेल. पण या मारहाण आणि संपामुळे त्याची जीवनयात्रा संपलीये. राजावाडी रुग्णालयात तीन तास तो उपचार होण्याची प्रतीक्षा करत होता... अखेरपर्यंत त्याला उपचार मिळाले नाहीत.  
 
इरशाद एकटाच नाही... असे शेकडो रुग्ण रोज उपचारांआभावी परत जातायत... अनेक शस्त्रक्रीयाही रद्द कराव्या लागल्यात... बदलापूरच्या सुधादेवी सिंग यांच्या डाव्या किडनीचं आज सकाळी आठ वाजता ऑपरेशन होतं... ते रद्द झालं.  



अशोक श्रीवास्तव यांनी मधुमेहामुळे आपला पाय गमावलाय. कापलेल्या पायाचं बँडेज रोज बदलणं आवश्यक असताना ते गेल्या तीन दिवसांपासून खेपा घातलायत.  त्यांची जखम चिघळली, तर जबाबदारी कुणाची?


या सुमन खत्री... फ्रॅक्चर झालेल्या पायात प्लेट टाकण्याची शस्त्रक्रीयाही आज होणार होती.... 


धक्कादायक बाब म्हणजे प्लॅस्टर असलेल्या या रुग्णांना प्रिस्क्रिप्शन नसल्यामुळे औषधंही विकत मिळत नाहीयेत... डॉक्टर म्हणजे पृथ्वीवरचा देव असतो म्हणे... पण सरकारवरचा राग हा देव आपल्या भक्तांवर काढतोय... हे किती योग्य आहे देवालाच ठावूक !