मुंबई गोवा- हायवेवर वाहतूक कोंडी काही तासानंतर फुटली

माणगावमध्ये रस्ता अरुंद असल्यानं 5 किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मुंबई : मुंबई गोवा- हायवेवर वाहतूक कोंडी काही तासांनंतर फुटलीय. माणगावमध्ये रस्ता अरुंद असल्यानं 5 किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्गावरच फेरिवाले, हॉटेल पार्किंग असल्यामुळे वाहतूकीत अडथळे निर्माण होतात.
त्यात सध्या शाळांना सुट्ट्या लागल्यात तसेच विकेंडलाही जोडून आलेल्या सु्ट्यांमळे पर्यटक आणि चाकरमान्यांची पावलं कोकणाकडे वळलीत.. त्यामुळे या रस्त्यावर मोठा ताण आला आणि वाहतूक कोंडी झाली होती.