मुंबई : गेल्या तीन वर्षांत लोकल ट्रेनला सुमारे साडेतीन हजार कोटींचा तोटा सहन करावा लागलाय. वाहतुकीसाठी सोसावा लागणारा खर्च आणि प्रवाशांना स्वस्त दरात दिले जाणारे मासिक पास यामुळं हा तोटा सहन करावा लागतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ही माहिती दिलीय. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रशअनाला उत्तर देताना प्रभूंनी ही मागिती दिलीय. लोकल ट्रेनच्या प्रवाशांना सर्वाधिक सबसिडी दिली जात असल्याचंही ते म्हणाले.


सुमारे 3 हजार 394 कोटींचा तोटा गेल्या तीन वर्षांत लोकल ट्रेन वाहतुकीतून सहन करावा लागलाय. उपनगरीय लोकल वाहतुकीला भाडेवआढ न करता ही वाहतूक अधिक लाभदायक करण्याचा प्रयत्न सरकारनं विविध प्रकारची पावलं उचलली आहेत.