मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा
काँग्रेसने यासाठी समाजावादी पार्टी आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा मागितला आहे.
मुंबई : महापौरपदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा होत असल्याचं दिसून येत आहे, कारण महापौरपदासाठी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार आहे. काँग्रेसने यासाठी समाजावादी पार्टी आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा मागितला आहे.
महापौरपदासाठी काँग्रेस आपला उमेदवार उभा केल्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेचा महापौरपदाचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे, कारण दुसऱ्या बाजूला मनसे आणि भाजपमध्ये सेल्फी पाँईंटवरून वाकयुद्ध सुरू झाल्याने, मनसे शेवटच्या क्षणी भाजपला पाठिंबा देईल, अशी शक्यताही मावळली आहे.
महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप ८२
शिवसेना ८४
काँग्रेस ३१
राष्ट्रवादी ०९
मनसे ०७
समाजवादी पार्टी ०६
अपक्ष ०५
एमआयएम ०२
एबीएस ०१