शिवसेनेला खिंडीत आणि काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी भाजपची खेळी
संपूर्ण देशात मुंबई महापालिकेत शिवसेनेचा की भाजपचा महापौर बसणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच महापौर बसणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, भाजपला सोबत न घेता सेनेने तयारी दर्शविली आहे. भाजपला सेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेला खिंडीत आणि काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी हालचाली सुरु केल्यात.
मुंबई : संपूर्ण देशात मुंबई महापालिकेत शिवसेनेचा की भाजपचा महापौर बसणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र, शिवसेनेने आमचाच महापौर बसणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, भाजपला सोबत न घेता सेनेने तयारी दर्शविली आहे. भाजपला सेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेला खिंडीत आणि काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी हालचाली सुरु केल्यात.
दरम्यान, 8 मार्चला उत्तर प्रदेशमध्ये अंतिम टप्प्यातील मतदान आहे. काँग्रेसने उघडपणे शिवसेनेला मदतीची भूमिका घेऊ नये, यासाठी ही खेळी असल्याचे म्हटले जात आहे. म्हणून भाजपला 8 मार्चला महापौर निवडणूक हवी आहे, अशी चर्चा आहे. जर काँग्रेसने मुंबईत महापौर निवडणुकीत शिवसेनेला मदत केली तर त्याचा छुपा प्रचार उत्तर प्रदेशमध्ये करण्याची व्युहरचना आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
एकीकडे शिवसेनेला दुखवायचे नाही. दुसरीकडे युतीसाठी हात पुढे करावयाचे धोरण भाजपने स्वीकारलेले दिसत आहे. मात्र, शिवसेनेकडून अधिकृत असा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे काँग्रेसला कोंडीत पकडून शिवसेनेला खिंडत गाठण्याचा डाव भाजपने केलाय. त्यासाठी एक दिवस आधीच महापौर निवडणूक घेतल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी ८ तारखेला निवडणूक झाल्यास मोठा पेच निर्माण होणार असल्याने प्रशासनाने कोणाच्याही दबावाखाली न येता नियमाप्रमाणेच निवडणूक घ्यावी असं म्हटले आहे. मात्र, आयुक्तांनी नवनिर्वाचित नगरसेवकांनाच निमंत्रण पाठविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेवाळे यांनी केलेल्या पेचाचा प्रश्न निकाली निघालाय.