मुंबई : मुंबई आणि परिसरात काल एका रात्री पोलिसांनी तब्बल सात डान्सबार, ऑर्केस्ट्रा बारवर छापे टाकले. यामध्ये सुमारे 90 बारबालांची सुटका करण्यात आलीये. तर सव्वाशेपेक्षा जास्त हॉटेल कर्मचारी आणि ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं केलेल्या धडक कारवाईत घाटकोपरचा महेफिल बार, मुंबई सेंट्रलचा समुद्र बार, ग्रँटरोडचा तेजस बार आणि अंधेरीच्या पिंक प्लाझा बारवर छापा टाकला. या कारवाईत 60 बारबालांची सुटका करण्यात आली, तर 75 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. 


दुसरीकडे मुंबईनजीक काशिमीरा भागात 3 ऑर्केस्ट्रा बारवर टाकलेल्या छाप्यांमध्ये 33 बारबालांची सुटका करण्यात आली. तर 36 कर्मचारी आणि 18 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलंय. 


या ऑर्केस्ट्रा बारमध्ये संगीताच्या नावाखाली अश्लील गाण्यांवर बारबालांचं नृत्य होत असल्याची खबर पोलिसांना लागली होती. एकीकडे डान्स बारच्या परवानगीवरून राज्य सरकार आणि बार मालक संघटनेमध्ये न्यायालयीन युद्ध सुरू असताना पोलिसांनी अनधिकृत बारना चाप लावायला सुरूवात केल्याचं या धडाकेबाज कारवाईतून दिसतंय.