मुंबई : पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सध्या मैदानी चाचणीपेक्षा वेगळ्याच चिंतेने ग्रासलंय. मुंबईतील पोलीस भरती केंद्रांवर नेमकं चाललंय तरी काय, एक रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत सुरु असलेल्या पोलीस  भरतीत आपलं नशीब आजमवायाला आलेला हा आहे ओमकार आंबेडकर.  इतर उमेदवारप्रमाणेच ओमकार मैदानी चाचणीसाठी मुंबईतील विक्रोळीत हायवेवरील मैदानी चाचणी केंद्रावर आला होता. पोलीस भरती असल्यामुळे साहजिकच पोलीस बंदोबस्तही असणार. त्यामुळे ओमकार आपली बॅग केंद्रावर ठेऊन मैदानी चाचणीसाठी निघाला. पण मैदानी चाचणी करून आल्यावर ओमकारची बॅग चोरीला गेलेली आढळली. त्यात त्याचा मोबाईल आणि पैसेही होते. 


नाशिकवरून पोलीस भरतीसाठी आलेल्या संजय चौधरीसोबत देखील असाच प्रकार घडला. ओमकार आणि संजय प्रमाणेच अनेक उमेदवारांना या भुरट्या चोरांच्या उच्छादाला सामोरं जावं लागतंय. भुरट्या चोरांची मजल इतकी वाढलीय की त्यांनी थेट  पोलीस केंद्रात घुसून उमेदवारांच्या बॅगा आणि पाकीटं लंपास करण्याचा सपाटा लावलाय.


केंद्राशेजारी असलेल्या झाडीत पडलेल्या ब्यागा आणि उमेदवरांची कागदपत्रांवरून याची प्रचिती  येतेय. याहूनही कहर म्हणजे आपला ऐवज हरवल्याची तक्रार नोंदवणाऱ्या उमेदवारांच्या हाती कुठलाही गुन्हा नोंद न करता गहाळ पत्र स्थानिक पोलीस देत आहेत. 



मुंबईत 17000 जागांसाठी पावणे दोन लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.  पोलीस प्रशासन मात्र सार काही अलबेल असल्याच सांगतंय. पोलीस व्हायच्या आधीच या उमेदवारांना पहिला सामना चोरांशी करावा लागतोय.