मुंबईतले बडे पोलीस अधिकारी होते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर
मुंबईतील बडे पोलीस अधिकारी हे टार्गेटवर होते असा खळबळजनक खुलासा मुंब्र्यातील तरुण नझीम शमशाद अहमद याने केलाय.
मुंबई : मुंबईतील बडे पोलीस अधिकारी हे टार्गेटवर होते असा खळबळजनक खुलासा मुंब्र्यातील तरुण नझीम शमशाद अहमद याने केलाय. नझीमला सध्या एटीएसने ताब्यात घेतलय.
मोठ्या पोलीस अधिका-यांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. उत्तरप्रदेशहून नझीम हा त्यासाठीच मुंबईत दाखल झाला होता. देशभरातील एकूण पाच राज्यातून दहशतवादी यासाठी सक्रिय बनले होते. फक्त मुंबईवरच हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. नजीम असे अनेक दहशतवादी राज्यातील अनेक भागात तयार करण्याचाही विचार करत होता अशीही माहीती समजतेय.