आलिशान क्रूझ सेवा आता मुंबईमधून
मुंबईमधून आता आलिशान क्रूझ सर्व्हीस सुरू होणार आहे.
मुंबई : मुंबईमधून आता आलिशान क्रूझ सर्व्हीस सुरू होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने याबाबत पुढाकार घेतला आहे. जर्मनीत तयार झालेली 18 मजली भव्य आलिशान क्रूझ उद्या मुंबईत दाखल होईल.
मुंबईत आल्यावर 2000 प्रवाशांना घेऊन या क्रूझचा पहिलाच प्रवास कोलंबोच्या दिशेने उद्याच होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने यासाठी खास तयारी केलीय.