मुंबईतील सनबर्न पार्टीचा उडला फज्जा...
पुण्यात शेवटच्या क्षणाला यशस्वी झालेली सनबर्न पार्टीचे मुंबई पोलिसांनी मात्र फज्जा उडवलाय.
मुंबई : पुण्यात शेवटच्या क्षणाला यशस्वी झालेली सनबर्न पार्टीचे मुंबई पोलिसांनी मात्र फज्जा उडवलाय.
शेवटच्या क्षणाला परवानगी मागायची आणि आपल्या पदरात परवानगी पाडून घ्यायची हा सनबर्नचा डाव मुंबई महापालिकेनंतर आता मुंबई पोलिसांनी ही हाणून पाडलाय.
आज सनबर्न फेस्टिव्हल सुरु होणार होता. सगळी तयारी झाली होती पण दोन दिवसांपूर्वीच बीएमसीने परवानगी नाकारल्याने सनबर्नने बीकेसी येथे पार्टीचे आयोजन करण्याचे ठरवले होते. याकरता त्यांना मुंबई पोलीसांची परवानगी आवश्यक होती. त्याकरता सरबर्नचे आयोजक मुंबई पोलीसांकडे आले होते.
मात्र मुंबई ही सतत दहशतवादाच्या टार्गेटवर असते अशात शेवटच्या क्षणाला परवानगी देणे कठीण असल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी सरबर्न पार्टी आयोजकांना परवानगी नाकारलीये. त्यामुळे आता पार्टीचे कशी करायची असा प्रश्न आता सनबर्न आयोजकांना पडलाय.