पुनर्मुल्यांकनातून मुंबई विद्यापीठानं कमावले कोट्यवधी रुपये
मुंबई विद्यापीठानं गेल्या तीन वर्षात विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकनातून कोट्यवधी रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठानं गेल्या तीन वर्षात विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकनातून कोट्यवधी रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.
गेल्या तीन वर्षात विद्यापीठानं पुनर्मुल्यांकनातून ७ कोटी ५२ लाख २६ हजार रुपयाची घसघशीत कमाई केली आहे. तर फोटोक़ॉपीतूनही तीन वर्षात 40 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई झाल्याचं माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीत समोर आलं आहे.