मुंबई : दरवर्षी मे महिन्यात मुंबईकरांपुढे उद्भवणारे पाणी संकट मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा टळलेले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्यस्थितीला ३ लाख ६७ हजार ९९१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा अजून १०० दिवस पुरेल असे नियोजन जलविभागाने केल्यामुळे यंदा मुंबईकरांची पाणी टंचाईची चिंता मिटलेली आहे. 


मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, भातसा आणि मध्य वैतरणा या तलावातून मुंबईकरांना प्रतिदिन ३७५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी सातही तलाव फूल्ल झाल्याने यावर्षी पाणी कपात न करता पाणीपुरवठ्याचे नियोजन आखणं बीएमसीला शक्य झालंय.