मुंबई :  काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ट्विट करुन दोन्ही पक्षातल्या नेत्यांना सल्ला दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या  नेत्यांनी बुडवायची भाषा बंद करून पाण्यातून मैदानात यावं आणि भाजप-शिवसेना सरकारशी जनतेच्या प्रश्नावर लढावं. 


कोणी कोणाला बुडवलं याचा विचार करण्यापेक्षा आपणच आपल्या पक्षाला बुडवलंय याचे आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दात ट्विट करत राणेंनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना उपरोधिक सल्ला दिलाय