नारायण राणेंचा शिवसेनेवर `प्रहार`
महापालिका निवडणुकांनंतर शिवसेना-भाजपमधला संघर्ष टोकाला गेलेला असताना विरोधकही या परिस्थितीचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई : महापालिका निवडणुकांनंतर शिवसेना-भाजपमधला संघर्ष टोकाला गेलेला असताना विरोधकही या परिस्थितीचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याच्या पवारांच्या वक्तव्याला काँग्रेस नेते नारायण राणेंनी दुजोरा दिलाय. भाजपनं हाकलल्याशिवाय शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याची बोचरी टीका नारायण राणे यांनी शिवसेनेवर केलीय.
मात्र फडणवीस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ लागतं. मात्र शिवसेनेच्या मदतीशिवाय ते शक्य नसल्याचंही राणेंनी बोलून दाखवलं. तर भाजपनं बेईमानी करून निवडणुका जिंकल्याचा आरोप राणेंनी केलाय.