मुंबई :  राज्यातील सरकार विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस अविश्वास ठराव आणला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, तसेच दोन्ही काँग्रेसच्या या खेळीला शिवसेना साथ देणार नाही असा विश्वास सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी २४ तासच्या रोखठोक कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले,  सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एकूण राज्यातील विधानसभेत ८१ च्या आसपास सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी अविश्वास ठराव आणला तरी तो फेटाळला जाईल. या खेळीत शिवसेना त्यांना साथ देणार नाही. शिवसेना सरकारमध्ये आहे. ते सरकार सोडणार नाही, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. 


अविश्वास ठराव फेटाळला जाणार यामुळे फडणवीस सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.