मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील आपल्या ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने यादी जाहीर करुन स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसबरोबर आघाडी होणार नसल्याचे दिसून आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते. मुंबई प्रदेशचे शहर अध्यक्ष सचिन आहिर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची महिली यादी जाहीर केली. यात महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.


राष्ट्रवादीने आपल्या ४५ उमेदवांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती सचिन आहिर यांनी दिली.


राष्ट्रवादी उमेदवारांची पहिली यादी