मुंबई : रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी सोपविलेले कोकणातील राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव नाराज आहेत. माजी आमदार रमेश कदम यांना चिपळूण-संगमेश्वरची जबाबदारी दिल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जाधव नाराज असले तरी ते पक्ष सोडणार नाहीत, असे खंडन कार्यकर्त्यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भास्कर जाधव हे नाराज असल्याने भाजपमध्ये जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. रमेश कदम यांच्याकडे नगरपरिषद निवडणुकीची सूत्रे दिलीत. मात्र, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनाही विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे निकमही नाराज आहेत. दरम्यान, भास्कर जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल आहेत.


जाधव प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय. तुम्हाला कोठे जायचे आहे तिकडे जा. मी काहीही सांगणार नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी जाधव यांचा वाद पूर्वीपासून वाद आहे. चिपळूणमध्ये मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यावेळी स्वागताध्यक्ष पद न मिळाल्याने जाधव यांनी तटकरे यांना टार्गेट केले होते. तेव्हापासून दोघेही एकमेकांना पाण्यात पाहत आहेत.