मुंबई : नीटमुळं अडचणीत आलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना आता अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. परिक्षेला आता केवळ दोन महिने शिल्लक असताना विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव सुरू झालीय. मात्र तरीही विद्यार्थ्यांसाठी एनसीआरटीची पुस्तकंच मुंबईत उपलब्ध नसल्याचं पुढं आलंय. त्यामुळं राज्यातल्या वैद्यकीय प्रवेशासाठी नीट देणा-या विद्यार्थ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रीम कोर्टाचा नीटबाबतचा निकाल राज्यांच्या विरोधात गेलाय. एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशांसाठी राज्य सरकार सीईटी घेऊ शकत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय. वैद्यकीय प्रवेश नीटच्या माध्यमातूनच होणार असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. 


त्यामुळे राज्यातल्या एमबीबीएस आणि बीडीएससाठी सीईटी देणा-या विद्यार्थ्यांना नीट देण्याशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट झालंय. मात्र 24 जुलैला होणारी दुस-या टप्प्यातली नीट देण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.