मुंबई : नीट संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. सोमवारी राज ठाकरे नीटसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी केंद्र सरकावर टीका केली. तसंच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर माझी भूमिका कळवेन, अशी प्रतिक्रीया यावेळी दिली.


दरम्यान, मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. परीक्षा झालीच पाहिजे. राज्य तसेच केंद्र सरकार याला दोषी आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. तर वैद्यकीय प्रवेशासाठी नीटची परीक्षा cbsc अभ्यासक्रमानुसार घेऊ नये, अशी मागणी करत विद्यार्थी, पालक आणि डॉक्टरांनी नागपूरमध्ये मोर्चा काढला. 



व्हेरायटी चौक ते संविधान चौक असा मोर्चा काढण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार २४ जुलै रोजी होणारी नीट परीक्षाच वैद्यकीय प्रवेशासाठी वैध असेल. मात्र HSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा जड जाईल, अशी भीती आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये रोष आहे. ही परीक्षा देवून मुलं नापास झाली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता ते विचारत आहेत.