राकेश त्रिवेदी, मुंबई : नव्या वर्षाचं पान बदलायला आता अवघे पंधरा दिवस बाकी आहेत... अनेकांचे न्यू इयर सेलिब्रेशनचे प्लॅन्स तयार होत असतील... त्याच वेळी आणखीही कुणीतरी तयारी करतंय... न्यू इयर पार्टीजमध्ये अमली पदार्थ पुरवणारे ड्रग्ज माफिया... मात्र यंदा या माफियांनी आपले लाडके बॉलीवुड स्टार्सच्या नावांचे कोडवर्ड बदललेत. 


कशी आहे दोन हजाराच्या नोटेची नशा?


पाचशेच्या नोटेमुळे कसली झिंग चढते? 


मोठ्या आणि छोट्या नोटेचं रहस्य काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैशाची नशा काही औरच असते... हे वाक्य आता शब्दशः खरं ठरणार आहे. 31 डिसेंबर जवळ येतेत आणि त्या अगोदर ड्ग्ज माफियांनी लढवलीय एक अनोखी शक्कल... ड्रग्जचे विक्रीचे कोडवर्ड हे त्यावर्षीच्या प्रचलित घडामोडीवर असतात आणि याच कोडवर्डच्या दुनियेत यंदा एन्ट्री घेतलीय डिमॉनिटायझेशन अर्थात नोटाबंदीनं... नोटबंदीमुळे जगासमोर आलेल्या शब्दांनी यंदा नशेचा सगळा बाजार खेळला जाणार आहे. 


काय आहेत यंदाचे कोडवर्ड... 


- बॅंक म्हणजे अंमलीपदार्थ मिळणारी जागा


- बॅंक मॅनेजर याचा अर्थ आहे ड्रग्ज माफिया


- कस्टमर म्हणजे शब्दशः नशेबाज ग्राहक


- मिटींग करायची असेल तर अकाऊंट खोलायचंय असं म्हटलं जातं


- ब्रान्च  म्हणजे प्रत्यक्षात माल स्विकारण्याची जागा


- कॅश म्हणजे अंमली पदार्थ


- डिपॉझीट करणं याचा अर्थ विक्री


- आणि अर्थातच विड्रॉ करणं म्हणजे खरेदी 


- पार्ट्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलएसडी, एक्सटेसी, एन बॉम्ब या अंमली पदार्थांसाठी 'मोठी नोट' हा कोडवर्ड आहे


- तर नेहमीच्या चरस, गांजा, एमडी इत्यांदीसाठी 'छोटी नोट' हा शब्द आहे


गाफील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आणि पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ड्रग्ज माफिया नेहमीच नवनवी शक्कल लढवत असतात. सध्या प्रचलित असलेली बँकिंगमधली नावं, हीदेखील अशीच एक शक्कल असल्याचं मुंबई पोलीस डेप्युटी कमिश्नर अशोक दुधे यांनी म्हटलंय. 


नशेच्या दुनियेत हे नवे कोडवर्ड फारच सोपे आणि सुटसुटीत असल्याचं मानलं जातं...


2 हजाराची नोट - पार्टी ड्रग एक्सटेसिची पिंक टेबलेट


500 ची नवी नोट - हिरव्या रंगाचा गांजा


500 ची जुनी नोट - पिवळ्या रंगाची MDMA ची गोळी


या कोडवर्डचा सुगावा लागल्यानंतर पोलीसही आता सतर्क झालेत... माफियांच्या कॉल्सवर त्यांचं बारीक लक्ष आहे... यंदा थर्टीफस्टला नोटाबंदी करण्याच्या तयारीत असलेल्या बँका आणि ब्रँच मॅनेजर्सवर पाश आवळण्याची पोलिसांची तयारी आहे.