मुंबई : आषाढी यात्रेसाठी रेल्वेच्या माध्यमातून 28 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.  विदर्भ आणि मराठवाड्यातल्या वारकऱ्यांना या गाड्यांचा विशेष फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 जुलैपासून अमरावती आणि लातूरमधून गाड्यांची वाहतूक सुरू होईल. 28 पैकी आठ गाड्या अमरावती आणि पंढरपूर दरम्यान धावतील. तर उऱलेल्या 20 गाड्या लातूर ते पंढरपूर दरम्यान वारकऱ्यांचा प्रवास सुकर करतील. 


20 जुलैपर्यंत ही सेवा सुरू राहिल. वारकऱ्यांची आपल्या लाडक्या विठुरायाशी भेट झाल्यावर त्यांना घरी परत येताना या सेवेचा विशेष फायदा होणार आहे.  या सेवेसाठी आरक्षणाची सुविधाही उपलब्ध असेल.