न्यूयॉर्क टाईम्सचं भाऊ दाजीलाड संग्रहालयासाठी आवाहन
येणारे पर्यटक मुंबईचा इतिहास मुंबईची संस्कृती समजून घेण्यासाठी, भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाला आवर्जून भेट देतात.
मुंबई : येणारे पर्यटक मुंबईचा इतिहास मुंबईची संस्कृती समजून घेण्यासाठी, भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाला आवर्जून भेट देतात.
या वस्तू संग्रहालयाचं महत्त्व लक्षात घेत, न्यूयॉर्क टाईम्सनं भाऊ दाजी लाड संग्रहालयाचा समावेश पर्यटकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठिकाणांच्या यादीमध्ये केलाय.
मुंबईतलंच काळा घोडा इथलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय सुप्रसिध्द आहेच. मात्र छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय पाहण्याइतका वेळ नसेल, तर पर्यटकांनी भाऊ दाजी लाड संग्रहालय नक्की पाहावं असं अवाहन, न्यूयॉर्क टाईम्सनं एका लेखाव्दारे केलंय.
1872 मध्ये सुरू झालेलं हे संग्रहालय आधी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम नावानं ओळखलं जात होतं. 1975 मध्ये त्याचं भाऊ दाजी लाड असं नामकरण करण्यात आलं.