मुंबई :  युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राणी बागेतल्या पेंग्वीन प्रकल्पाचं उद्घाटन कराल तर गोंधळ घालू असा इशारा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नसेल तर पेंग्वीनदर्शन कार्यक्रम होऊ नये, अशी मागणी नितेश राणेंची पालिका आयुक्तांकडे केली आहे. 


हायवे कस्ट्रक्शन नावाच्या कंपनीला पेंग्वीन आणण्याचा अधिकार नसताना, त्यांनी आणले होते. त्याबाबत लोकायुक्तांकडेही चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत पेंग्वीन प्रकल्पाचं उद्घाटन करता येणार नाही, असेही नितेश राणे यांनी सांगितले. 


किती शुल्क आकारावे याचे अधिकार पालिकेला नाहीत. सेंट्रल झू अथॉरिटीला ते अधिकार आहेत



भ्रष्टाचारी कंत्राटदार हे आदित्य ठाकरेंचे खास दोस्त...


पेंग्वीन प्रकल्पात आणि पवईच्या पक्षी उद्यानाचे काम अनुभव नसतांनाही दिले गेलेय,  पक्षी उद्यानात भ्रष्टाचार केलेल्या तन्मय राय या भ्रष्टाचारी कंत्राटदारासोबत आदीत्य ठाकरेंचे फोटो आहे. 


ज्या हायवे कन्स्ट्रक्शनला पेंग्वीनच्या देखभालीचे काम दिले गेले त्याच कंपनीचा मालक असलेल्या तन्मय राय हा पेंग्वीन पक्ष्यांसाठी पेंग्वीन पक्ष्यांसाठी बांधलेल्या कमी दर्जाच्या पिंज-यामुळे ब्लँकलिस्टेड करण्यात आलेला कंत्राटदार आहे.


तन्मय राय याची युनिवर्सल ऑर्गेनिक या दुस-या कंपनीलाही या आधी पवईच्या पक्षी उद्यानाचे काम अनुभव नसतांनाही दिले गेलेय...त्याबाबत सध्या इतर कंत्राटदारांनी दाखल केलेली केस कोर्टात सुरु आहे.


भ्रष्टाचा-यांवर थेट मातोश्रीचा वरदहस्त असल्याचा आरोपही नितेश राणे यांनी केला.