मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या पासष्टीच्या निमित्तानं आज मुंबईत एका विशेष अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवींद्र नाट्यमंदिरात सुरु असलेल्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्तेपरिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित आहेत.


या शिवाय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील असे वेगवेगळ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते राणेंच्या सत्कारला हजर आहेत.


गेल्या काही दिवसात नारायण राणेंचा अशोक चव्हाणांशी दुरावा आणि भाजपची वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. त्याचपार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होत आहे.


विशेष म्हणजे या सुशीलकुमार शिंदे सोडले तरं कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही बडा नेते मंचावर हजर नाही.