मुंबई : मु्ंबईत पंधरा वर्षाखालील मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत गेल्या तीन वर्षात तब्बल १४४ टक्क्यांची वाढ झालीय. त्यामुळे सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या नव्या आकडेवारीनं चिंता व्यक्त होऊ लागलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०१५-१६ या वर्षात पंधरा वर्षाखालील गर्भपात करणाऱ्या मुलींची संख्या १८५ वर जाऊन पोहचलीय. २०१४-१५ मध्ये ही संख्या १११ होती. तर गेल्या तीन वर्षात अशा एकूण २७१ अल्पवयीन मुलींचे गर्भपात करण्यात आले आहेत.  


दरम्यान 15 ते 19 वयोगटातल्या मुलींमध्ये मात्र गर्भपाताची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचंही बीएमसीच्या आकडेवारीत पुढे आलय. त्याचप्रमाणे गर्भपातादरम्यान गेल्यावर्षी आठ महिलांचा मृत्यू झालाय.