टॉप 10 विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाला स्थान नाही
केंद्र सरकारनं जारी केलेल्या देशातल्या दहा प्रमुख विद्यापाठींच्या यादीत मुंबई विद्यापीठाला स्थान मिळालेलं नाही.
मुंबई : केंद्र सरकारनं जारी केलेल्या देशातल्या दहा प्रमुख विद्यापाठींच्या यादीत मुंबई विद्यापीठाला स्थान मिळालेलं नाही. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठला दहावं स्थान मिळालयं. दरम्यान विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानी बंगळूरमधली इंडियन इन्सिट्युटू ऑफ सायन्स सर्वोच्च स्थानी असून दुसऱ्या क्रमांक गेल्या काही दिवसात वादग्रस्त ठरलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठानं पटकावला आहे.
नॅक आणि एमडीएकडून विद्यापीठांचं मूल्यांकन केलं जात होतं. परंतु मोदी सरकारने संस्थांचं रॅंकीग करण्याचा निर्णय घेतला. गुणवत्ता असलेल्या संस्था लोकांना कळावी हा यामागचा उद्देश आहे. चांगल्या गुणवत्तेच्या संस्थांना जास्त महत्त्व देण्यात येणार आहे.