मुंबई : मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ करण्याचं शिवसेनेचं आश्वासन हवेतच विरलं आहे. महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेनं मुंबईतल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं तसंच ५०० ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही मालमत्ता करात सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेमध्ये आज बजेट सादर करण्यात आलं, पण या बजेटमध्ये मालमत्ता करमाफीबाबत कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. यामुळे निवडणुकीपूर्वीचं शिवसेनेचं आश्वासन हवेतच विरलं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


पाहा निवडणुकीपूर्वी काय म्हणाले होते उद्धव ठाकरे