मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर टोल माफीची घोषणा केली. त्यानंतर लगेचच राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे देऊ नका. 11 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत टोल द्यावा लागणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


रस्त्यावरील आणि महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंत ही सुट देण्यात देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.