मुंबई : रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या समस्येवर प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रपतींकडे मागणी केलीय. ममतांनी या मागणीसाठी काढलेल्या मार्चमध्ये शिवसेनेचे खासदारही सामील झाले होते. शिवसेनेनं सरकारमध्ये असूनही सरकारविरोधी भूमिका घेतल्यानं सरकराच्या प्रतिमेला धक्का बसलाय. 


त्यामुळे आता शिवसेनेचं मन वळवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झाले आहेत. नोटाबंदीमुळे जनतेला होणाऱ्या त्रासाविषय़ी उद्धव ठाकरेंनी वारंवार तीव्र नाराजी व्यक्त केली.