पेंग्विन मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस
जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतल्या पेंग्विन मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने ही नोटीस बजावली आहे.
मुंबई : जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतल्या पेंग्विन मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने ही नोटीस बजावली आहे.
अयोग्य सुविधांमुळे पेंग्विनचा मृत्यू झालाय का असा सवाल या नोटीसमधून पालिका आयुक्तांना विचारण्यात आला आहे. तसंच पेंग्विनची योग्य देखभाल केली जातेय का? आणि पेंग्विन ठेवलेली जागा योग्य आहे का असा सवालही या नोटीशीमधून उपस्थित करण्यात आला आहे.