मुंबई : सोन साखळी चोरट्यांना यापुढे कायद्याचा लगाम असणार आहे. राज्यात सोनसाखळी आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेणाऱ्या चोरट्यांना यापुढे ३ ऐवजी पाच वर्षांची कडक शिक्षा केली जाणार आहे. 


२५ हजाराचा दंडही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किमान २ ते कमाल ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होणार आहे. तसंच २५ हजाराचा दंडही करण्य़ात येईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. येत्या अधिवेशनात यासंबंधीच्या कायद्यात दुरूस्ती करण्यात येणार आहे. 


राज्यात २०११ पासून २५४९७ सोनसाखळी चोरीचे गुन्हे नोंदवण्यात आलेत. या प्रकारच्या गुन्ह्यावर नियंत्रण आणण्यासाठी आता सरकारने शिक्षा कठोर करण्याचा निर्णय घेतलाय.