मुंबई : राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. सर्व प्रक्रिया सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील जनता ही मराठी भाषिक असून प्रत्येक नागरिकाला विकास आराखडय़ातील नेमके काय मुद्दे आहेत हे समजलं पाहिजे . त्यामुळे हे सगळे आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही असले पाहिजेत अशी मागणी करणारी जनहित  याचिका संतराम तराले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर कोर्टानं हा निर्णय घेतला आहे.


राज्य सरकारने ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे अशी माहिती कोर्टाला दिली. पण ही सगळी प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देत याचिका निकाली काढली. 


शहर विकास आराखडा इंग्रजीतून प्रसिद्ध होत असल्याने तो मराठीतून प्रसिद्ध करण्याचे राज्य सरकारला आदेश द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती.