रेशन कार्ड लवकरच मिळणार ऑनलाईन
रेशन-कार्ड म्हटलं की, तहसिल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात, पण आता रेशन कार्डसाठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. याची सुरूवात मुंबईतील गोरेगाव आणि विक्रोळीभागापासून झाली आहे.
मुंबई : रेशन-कार्ड म्हटलं की, तहसिल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात, पण आता रेशन कार्डसाठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. याची सुरूवात मुंबईतील गोरेगाव आणि विक्रोळीभागापासून झाली आहे.
नागरिकांकडून रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज मागिवले आहेत. अर्जदारांना ३० दिवसांत रेशन-कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच ही सुविधा मुंबई आणि महाराष्ट्रात राबविण्यात येईल.
अन्न आणि पुरवठा विभागाच्या वेब पोर्टलवर, तसेच राज्य सरकारच्या आपलं सरकार वेबवर, अॅपवर जाऊन रेशनकार्डसाठी अर्ज करता येणार आहे.
अन्न आणि पुरवठा विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांने याविषयी माहिती देताना सांगितलं, 'सेवा हमी कायद्यानुसार रेशनिंग सेवा ऑनलाईन करण्यात येत आहे, आम्ही सध्या गोरेगाव, विक्रोळीतील नागरिकांकडून रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज मागवणार आहोत.
ते इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करु शकतात. त्यानुसार इच्छूकांना आपले सर्व डॉक्यूमेंट स्कॅन करून जोडावे लागणार आहेत. त्यानंतर डॉक्यूमेंट व्हेरीफाय करण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट दिल्यानंतर डॉक्यूमेंट सादर केल्यास ३० दिवसांत रेशन कार्ड मिळणार आहे.'