मुंबई : दिवाळीचे दिवस तोंडावर असतांना मुंबईच्या कापड बाजारातली उलाढाल मात्र दोन दिवस थंडावणार आहे. दोन दिवस कामगार आपल्या मागण्यांसाठी बंद पाळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सणासुदीच्या दिवसातच कापड बाजारात काम करणाऱ्या गुमास्ता कामगारांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी १४ आणि १५ ऑक्टोबरला बंद पुकारला आहे. त्यामुळे मुंबईतील मंगलदास मार्केट, कंफर्ड मार्केट, जुनी हनुमान गल्ली या कापड बाजारातील वीस ते पंचवीस हजार गुमास्ता कामगार या संपात सहभागी होणार आहेत.


या कामगारांना पगारवाढीसोबतच आरोग्य वीमा कवचही मिळायला हवे ही मागणी गुमास्ता कामगार संघटनेने केली आहे. जर या दोन दिवसांत मागण्यांना प्रतिसाद मिळाला नाही तर बेमुदत संपाचा इशाराही संघटनेनं दिला आहे.