मुंबई : मालाड येथील मालवणीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याचे दुर्दैवी घटना उजेडात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे हत्याकांड घडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजीसह दोन नातवंडाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. मालवणीतील न्यू कलेक्टर कॉलनीतील गेट क्रमांक - ६, प्लॉट नंबर २३ येथे राहणाऱ्या कुटुंबीयांचे हत्यांकाड करण्यात आले. यामागचे कारण अजून समजू शकलेले नाही. 


बाबली शॉ (४७), आर्यन इस्माइल शेख (१३) आणि सायना इस्माल शेख (८) अशी मृतांची नावे आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत.
हे सर्वजण मूळचे बंगळुरूचे आहेत.


बाबली यांच्या मुलीने मुस्लिम तरूणाशी प्रेमविवाह केला होता. मात्र त्या तरुणाने दुसरा विवाह केल्याने बाबली यांची मुलगी, आर्यन आणि सायना या तिच्या दोन मुलांसह पाच वर्षांपूर्वी माहेरी परत आली. तेव्हापासून ती त्यांच्याकडेच राहत होती. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचेही आजाराने निधन झाले. तेव्हापासून त्यांची आजीच मुलांचा सांभाळ करत होती.