विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदारांचे निलंबन
कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन जोरदार हंगामा करणाऱ्या आमदारांना जोरदार दणका देण्यात आला आहे. विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदार निलंबित करण्यात आले आहेत.
मुंबई : कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन जोरदार हंगामा करणाऱ्या आमदारांना जोरदार दणका देण्यात आला आहे. विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदार निलंबित करण्यात आले आहेत.
अर्थसंकल्पात अडथळे आणणे, सभागृहात बॅनर फडकवणे, टाळ वाजवणे, अध्यक्षांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना न पाळणे, सभागृहाबाहेर अर्थसंकल्प जाळणे, सभागृहाचा अवमान करणे आदीप्रकरणी या आमदारांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या 19 आमदारांचे निलंबन हे 22 मार्च ते 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे.
निलंबित आमदार
1) अमर काळे
2) भास्कर जाधव
3) विजय़ वडेट्टीवर
4) मधुसुदन केंद्रे
5) हर्षवर्धन सकपाळ
6) कुणाल पाटील
7) जितेंद्र आव्हाड
8) दीपक चव्हाण
9) राहुल जगताप
10) संग्राम थोपटे
11) संग्राम जगताप
12) अमित झनक
13) डी पी सावंत.
14) अवधूत तटकरे
15) अब्दुल सत्तार
16) वैभव पिचड
17) जयकुमार गोरे
18) नरहरी जिरवाळ
19) दत्ता भरणे