मुंबई : तीन दिवसांच्या खंडानंतर आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाचा हा चौथा आठवडा असून विधानपरिषदमध्ये विरोधकांच्या आक्रमकपणामुळे अजिबात कामकाज झाले नाही.  तर विधानसभेत विरोधकांच्या बहिष्कारामुळे विधानसभा चर्चेत राहिलेली आहे.


विधानसभेत येऊन विरोधकांनी सरकारला विनंती केली तर अर्थसंकल्पाच्या वेळी गोंधळ घातलेल्या काही आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत चर्चा करू अशी भूमिका राज्य सरकारने गेल्या शनिवारी घेतली होती. तेव्हा विधानसभेत विरोधक उपस्थित राहतात का याकडे लक्ष असणार आहे. तर विधानसभेतील विरोधक आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार असून कामकाजावर बहिष्कार कायम ठेवणार असल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विधानसभेतील तिढा सुटणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. तर संख्याबळ जास्त असल्याने विधानपरिषदमध्ये कामकाजात सहभाग असेल मात्र कामकाज चालु देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी  घेतली आहे. त्यामुळे अधिवेशनचा चौथा आठवड़ामध्ये कामकाजाची कोंडी फोडण्यासाठी सत्ताताधारी काय करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.