गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती निश्चित
मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती अखेर निश्चित करण्यात आल्या आहेत.
मुंबई : मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती अखेर निश्चित करण्यात आल्या आहेत.
गिरण्यांच्या जमिनीवर बांधलेल्या घराची किंमत साडे नऊ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या घराचं क्षेत्रफळ २२५ चौरस फूट एवढं आहे. तर एमएमआरडीएच्या घराची किंमत सहा लाख रुपये ठेवण्यात आली असून या घराचं क्षेत्रफळ ३२० चौरस फूट असणार आहे.
गिरणीच्या जमिनीवरील २,६३४ घरं आणि एमएमआऱडीएच्या २,४१८ घरांसाठी लवकरच लॉटरी काढण्यात येणार आहे.
पाहूयात कोणत्या परिसरात किती घरं उपलब्ध होणार आहे ते....
- एकूण ५०५२ सदनिका उपलब्ध होणार
- यातील २६३४ घरं मुंबईत तर उरलेली २४१८ घरं एमएमआर रिजनमध्ये असतील
- सेंच्युरी मिल १४३० घर
- प्रकाश कॉटन मिल ५६२ घर
- भारत मिल १८८
- रुबी मिल ४७
- जुबली मिल १२७
- वेस्टर्न इंडिया मिल २५० घर