मुंबई : महापालिकेच्या तिकिटासाठी सर्वच पक्षांमध्ये आयाराम-गयारामचा सुळसुळाट होता. मात्र घाटकोपरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी मात्र पक्षांतराचा वेगळाच विक्रम नोंदलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही महिन्यांपासून त्या भाजपचं काम करत होत्या. मात्र भाजपनं घाटकोपरच्या प्रभाग 120 मधून त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळं त्यांनी शिवसेनेचा दरवाजा ठोठावला. 


शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली. मात्र एबी फॉर्ममध्ये तांत्रिक अडचण असल्याचं सांगत फॉर्म काढून घेतला. त्यामुळं प्रतीक्षा घुगे यांचा हिरमोड झाला. मात्र त्यांना अखेरच्या क्षणी काँग्रेसनं उमेदवारीचा हात दिला. त्यामुळं. एकाच दिवसात तीन पक्षांमध्ये त्यांनी प्रवास केला.