मुंबई : एका शाळेने पालकांसाठी नियमावली बनवली आहे, त्यावर स्वाक्षरी देखील घेतली आहे, यात म्हटलंय मी शाळेत येतांना शालीन आणि साधे कपडे घालून येईन. अप्रत्यक्षपणे पालकांनाही ड्रेस कोड या शाळेने जारी केला आहे. ही शाळा वांद्रेतील रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे पालक ३० मार्च रोजी प्रगतीपुस्तक घेण्यासाठी शाळेत पोहोचले, त्यावेळी त्यांना नियमावलीची यादीच सोपवण्यात आली होती.


‘मी शाळेत साधे आणि शालीन कपडे घालून येईन. जर तसं केलं नाही तर परिणामांसाठी मी स्वत:च जबाबदार असेन, असं या नियमावलीत लिहिलं आहे, तसेच यावर पालकांनी स्वाक्षरी करावी, अशी शाळेची अपेक्षा होती.


एवढंच नाही तर मीटिंगदरम्यान पालकांनी आपापले मोबाईल रिसेप्शनवर ठेवावेत. तसंच स्टाफला अकारण कोणतेही प्रश्न विचारु नये आणि त्यांच्यासोबत बोलताना भाषा योग्य असावी, असंही सांगण्यात आलं आहे.


तर शाळेचा स्टाफ, फी वाढ आणि व्यवस्थापन याबाबत अनेक तक्रारी आहेत. आमच्यापैकी काही जण त्याचा विरोध करत आहोत. त्यामुळे आमचा आवाज दाबण्यासाठीच ही नियमावली आणल्याचा आरोप पालकांनी केला आहे.


तसेच, शाळेचा हा फतवा अनेक पालकांना आवडला नाही. पालकांनी काय घालावं किंवा काय घालू नये, मोबाईल वापरावा का, हे आम्हाला शाळेने सांगू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया काही पालकांनी दिली.