मुंबई : राणीच्या बागेतील प्रवेश शुल्क वाढवण्याच्या प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत फेटाळण्यात आलाय. याविषयी मार्च नंतर विचार करण्यात येणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय पेग्विन बघण्यासाठी कुठलही वेगळं शुल्क लादणार नसल्याचं गटनेत्यांच्या बैठकीनंतर स्पष्ट झालंय. फक्त लहान मुलांना पेंग्विन पाहण्यासाठी पालकांना जाता येईल. पण इतर वेळी मोठ्या माणसांना पेंग्विनचं दर्शन दुर्लभ होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना मोफत तर मुंबईकरांना कमीत कमी शुल्कात पेंग्विनचं दर्शन होईल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय.


शिवसेनेच्या शिव आरोग्य योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे उद्घाटन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते आज खार पूर्व येथे झाले. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलंय.