मुंबई : शहरातील पेट्रोल पंप 11 आणि 12 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १२ ते पहाटे ५ पर्यंत बंद राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई पेट्रोल डिझेल असोसिएशनने घेतला आहे. केंद्र सरकारने मंगळवारी पाचशे व हजार रूपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे. 


केंद्र सरकारने पेट्रोल पंप, रूग्णालये, औषध दुकाने आणि रेल्वे स्टेशनवर या नोटा स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. पेट्रोल पंपावर वादाचे प्रसंग घडू नयेत म्हणून असोसिएशनने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.


शनिवारी पहाटे पाचनंतर पेट्रोल पंप पुन्हा सुरू होणार आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे पेट्रोल डिझेल असोसिएशनने स्पष्ट केले.