मुंबई :  प्रोव्हिडंट फंडच्या व्याजाने दरात सध्या वाढ झाली आहे, बचत करणाऱ्यांनी आणि टॅक्स वाचवणाऱ्यांनी या योजनेला अधिक आकर्षक केलं आहे.


योजनेची माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंडच्या सर्व नोकरदारांना लागू असते. तुमच्या बेसिक पगारातून १२ टक्के व्याज कापले जाते, आणि ते तुमच्या EPF खात्यात जमा होते.


तुमची कंपनी तुमच्या पगाराचा 3.33 टक्के भाग यात टाकते, आणि 8.67 टक्के पेन्शनसाठी बाजूला ठेवते.


फायदा काय?


दर वर्षी भविष्य निर्वाह निधी संस्थेकडून किती व्याज दिलं जाईल याची घोषणा होते, ज्यात PF ची कमाई किती असेल याची घोषणा होते. वर्ष २०१५ आणि २०१६ साठी पीएफ व्याज ८.७५ टक्क्यांवरून ८.८ टक्के करण्यात आले आहे.


टॅक्सही वाचवा


पीएफमध्ये आपल्या कमाईकवर सेक्सन ८० सी नुसार टॅक्समध्ये सूट मिळवण्यासाठी दावा करता येतो. दरवर्षी दीड लाखांच्या कमाईवर ही सूट मिळवता येऊ शकते.


EPF चे फायदे



EPF मध्ये सर्वात जास्त रक्कमेवर टॅक्स नाही लावला जात, विशेष म्हणजे रक्कम काढतानाही टॅक्स लागत नाही.
तुम्ही उच्च शिक्षण, मुलाचं लग्न, घर खरेदी या सारख्या मोठ्या खर्चासाठी पीएफमधून रक्कम काढू शकतात.
आपली रक्कम वाढवण्यासाठी तुम्ही जास्त प्रमाणात पीएफ कापू शकतात.
तुमची रक्कम छोटी असली तरी तुम्हाला पेन्शन मिळेल.