वैद्यकीय सीईटीनंतर आता पीजी सुपरस्पेशालिस्टच्या टेस्टबाबत संभ्रम
वैद्यकीय सीईटीनंतर आता पीजी सुपरस्पेशालिस्टच्या टेस्टबाबत संभ्रम निर्माण झालाय. पीजीसाठी सीईटी घ्यायची की नीट याचा संभ्रम निर्माण झालाय. 10 जूनला पीजीची सीईटी होणार आहे. त्यामुळं यासाठी आता कोणती परीक्षा होणार याबाबत एमडी आणि MS च्या डॉक्टर्समध्ये संभ्रम आहे.
मुंबई : वैद्यकीय सीईटीनंतर आता पीजी सुपरस्पेशालिस्टच्या टेस्टबाबत संभ्रम निर्माण झालाय. पीजीसाठी सीईटी घ्यायची की नीट याचा संभ्रम निर्माण झालाय. 10 जूनला पीजीची सीईटी होणार आहे. त्यामुळं यासाठी आता कोणती परीक्षा होणार याबाबत एमडी आणि MS च्या डॉक्टर्समध्ये संभ्रम आहे.
विद्यार्थ्यांसमोर नवं संकट
नीटमुळं अडचणीत आलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना आता अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. परिक्षेला आता केवळ दोन महिने शिल्लक असताना विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव सुरू झालीय. मात्र तरीही विद्यार्थ्यांना एनसीआरटीची पुस्तकंच मुंबईत उपलब्ध नसल्याचं पुढं आलंय. त्यामुळं राज्यातल्या वैद्यकीय प्रवेशासाठी नीट देणा-या विद्यार्थ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय.
पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका
मेडिकल प्रवेशासाठी सीईटीची वैधता सुप्रीम कोर्टानं अमान्य केल्यावर आता राज्य आणि केंद्र सरकारनं पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका दाखल केलीय. २४ जुलैला होणारी दुस-या टप्प्यातली नीट देण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
सात भाषांमध्ये परीक्षा घ्या
नीटची ही परीक्षा मराठीसह सात भाषांमध्ये घेण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायलयाकडे केंद्र सरकारनं दाखल केलीय. त्यावर विचार करण्याची सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवलीय. नीट परीक्षाच आता वैध असल्यामुळे या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. विशेषतः SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा जड जाण्याची शक्यता आहे.