फोटो : मुंबईतल्या माटुंग्यात घ्या नर्मदा परिक्रमेचा अनुभव!
मुंबईमध्ये राहून तुम्हाला नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्यायचाय? अमर कंटक ते भरूच असा प्रवास करायचाय? तोदेखील एका पुलाखाली?
मुंबई : मुंबईमध्ये राहून तुम्हाला नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्यायचाय? अमर कंटक ते भरूच असा प्रवास करायचाय? तोदेखील एका पुलाखाली?
मग, तुम्हाला माटुंग्याला जावं लागेल... नानालाल मेहता उड्डाण पुलाखालची सात हजार दोनशे चौरस मीटरची जागा महापालिकेनं सुशोभित केलीय.
'नर्मदा नदी मार्गक्रमणा' या थिमवर हे सुशोभिकरण करण्यात आलंय. अमर कंटक, बेडाघाट, होशंगाबाद, ओंकारेश्वर, महेश्वर, रेवाकुंड, शूळपानेश्वर आणि भरूच या आठ स्थळांचं विवरण मार्गावर देण्यात आलंय.
याखेरीज वॉकिंग ट्रक, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, योगाभ्यासासाठी जागा, समूह बैठकीची व्यवस्थाही इथं करण्यात आलीय.
विविध झाडं आणि हिरवळही या ठिकाणी आहे. महापालिकेनं ए.पी.आय. सिव्हिलकॉन या कंपनीला पाच कोटी रुपयांचं हे कंत्राट दिलं होतं.
११ महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण झालंय.